एशिया न्यूज बीड

धुळे–सोलापूर महामार्गावरील दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

धुळे–सोलापूर महामार्गावरील दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

धुळे–सोलापूर महामार्गावरील दरोडा व जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

एक दरोडा व तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस

(स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची उल्लेखनीय कामगिरी)

धुळे–सोलापूर महामार्गासह बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवाशांची वाहने अडवून काचा फोडणे, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एक दरोड्याचा व तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी धुळे–सोलापूर महामार्गावरील वडगाव ढोक, ता. गेवराई येथे रस्त्यावर अडथळा टाकून बाहेर राज्यातील प्रवाशांची गाडी अडवण्यात आली. आरोपींनी वाहनातील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती. याप्रकरणी पोलीस ठाणे गेवराई येथे गु.र.नं. 714/2025 कलम 309(6) बी.एन.एस. अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी बीड शहरातील संभाजी महाराज चौक परिसरात चालक झोपलेला असताना वाहनाची काच फोडून प्रवाशांना मारहाण करत सोने-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गु.र.नं. 316/2025 दाखल होता.

याशिवाय 20 नोव्हेंबर 2025 रोजी हटील दुबई समोर पार्क केलेल्या वाहनातील प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या होत्या (गु.र.नं. 402/2025). तसेच 09 नोव्हेंबर 2025 रोजी धनवडे वस्ती, पाली येथे वाहन अडवून रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना घडली होती (गु.र.नं. 417/2025).

महामार्गावरील वाढत्या जबरी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होते.

दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळाली. आरोपी चारचाकी वाहनातून कळंब–केज मार्गे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

1. राहुल अनिल काळे (वय 19)

2. विकास अनिल काळे (वय 21)

3. अनिल रामा काळे (वय 40)

(सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव)

चौकशीत आरोपींनी त्यांचे अन्य साथीदार

सुनील हिरामण शिंदे, सचिन उर्फ आवड्या रामा काळे व बबलू शिवा शिंदे

यांच्यासह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडून काळ्या रंगाची विना नंबरची एमजी हेक्टर चारचाकी, एक कोयता व लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहेत. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस ठाणे गेवराईचे सपोनि अण्णासाहेब पवार करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. नवनीत कांवत (पोलीस अधीक्षक, बीड), सचिन पांडकर (अपर पोलीस अधीक्षक) व शिवाजी बंटेवाड (स्थागुशा, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *