- बाळराजे पवारांना अटक
- गेवराईत पोलिसाचा तगडा बंदोबस्त
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात राजकीय संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली हाणामारी
गेल्या 2 डिसेंबर रोजी गेवराई नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन राजकीय गट समोरासमोर आले होते. माजी आमदार लक्ष्मण पवार आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये यावेळी मोठी हाणामारी झाली होती. या संघर्षात बाळराजे पवार यांनी अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र बाळराजे पवार ही रात्री स्वतःहून गेवराई पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सांगण्यात आले.


