एशिया न्यूज बीड

जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या बैठकीला सर्व कार्यालय प्रमुखांना बोलावून समाजाच्या समस्यावर चर्चा करुन तोडगा काढावा                            संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची मागणी

जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या बैठकीला सर्व कार्यालय प्रमुखांना बोलावून समाजाच्या समस्यावर चर्चा करुन तोडगा काढावा                             संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची मागणी

जिल्हाधिकारी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या बैठकीला सर्व कार्यालय प्रमुखांना बोलावून समाजाच्या समस्यावर चर्चा करुन तोडगा काढावा

संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांची मागणी

बीड प्रतिनिधि: लोकसेना संघटना प्रमुख तथा संघर्षयोध्दा ॲड.प्रा. इलियास इनामदार यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांना स्वत भेट घेवून अल्पसंख्याक समाजाच्या समस्या विषयी सविस्तर चर्चा केली व अल्पसंख्याक हक्क दिनाच्या बैठकीला सर्व कार्यालय प्रमुखांना बोलावून समाजाच्या समस्यावर चर्चा करुन तोडगा काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 

अठरा डिसेंबर हा जागतिक स्तरावर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी शासनाने व प्रशासनाने अल्पसंख्याक समाजासाठी कोण कोणत्या योजना आणल्या, राबवल्या व पुढे राबवणार याची सविस्तर माहिती अठरा डिसेंबर रोजी शासकिय प्रशासकिय ठिकाणी कार्यक्र‌माचे आयोजन करून हा दिवस साजरा करुन माहिती दयावी लागते.

 

दर वर्षी बीडला पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिन हर्सोउल्लासात साजरा केला जातो परंतु मागील तीन वर्षापासून सतत जिल्हाधिकारी यांची या बैठकीला गैरहजेरी असून या वर्षी तरी जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्हाभरातील सर्व शासकिय निमशासकिय कार्यालय प्रमुख जसे जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, एसडीएम, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक/ माध्यामिक शिक्षणाधिकारी, सर्व तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, बँकेचे एल डी एम, डायटचे प्राचार्य, मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक,

आयटीआयचे प्राचार्य, पासपोर्ट अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, महात्मा ज्योतीबा फुले आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, समाज कल्याण अधिकारी, जात प्रमाणपत्र पडताळणी अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी इत्यादींना सक्तीने बैठकीला बोलावून अल्पसंख्याक समाजाच्या सर्व पक्ष संघटना संस्थेच्या प्रतिनिधि सोबत शैक्षणिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व राजकीय विषयासह सरकारी योजना विषयी चर्चा करुन मार्ग काढावे व अल्पसंख्याक दिवस साजरा करावा.

अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख तथा संघर्षयोध्दा ॲड.प्रा. इलियास इनामदार यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांना स्वत भेट घेवून केली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाच्या बैठकीला अल्पसंख्याक समाजाच्या समस्यावर तोडगा आवश्य काढण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देताना प्रा. सरफराज काज़ी सोबत होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *