- कॅबिनेट मंत्रीपद आमदार प्रकाश दादा यांना द्यावे – राष्ट्रवादी शहराध्यक्ष सय्यद नाझेम अजिमोद्दीन यांची मागणी
बीड | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट)चे शहराध्यक्ष सय्यद नाझेम अजिमोद्दीन यांनी आमदार प्रकाश दादा यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी ठाम मागणी केली आहे. पक्षसंघटन मजबूत करताना तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार प्रकाश दादा यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आमदार प्रकाश दादा हे अनुभवी, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे झाली असून, मंत्रिपदाच्या माध्यमातून हा विकासाचा वेग अधिक वाढेल, असा विश्वास नाझेम अजिमोद्दीन सय्यद यांनी व्यक्त केला.
राज्य नेतृत्वाने व पक्षाच्या वरिष्ठांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


