गो. से. महाविद्यालय खामगावच्या एनसीसी कॅडेट राष्ट्रपाल गवारगुरु याची 2026 च्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमु
खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथील एनसीसी युनिटमधील कॅडेट Juo राष्ट्रपाल गवारगुरु याची दिल्ली येथे 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी अंतिम निवड झाल्याने महाविद्यालयासह संपूर्ण खामगाव तालुक्यात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण, दीर्घकालीन व बहुपातळी स्वरूपाची असते. गो. से. महाविद्यालय खामगाव एनसीसी युनिट एनसीसी अधिकारी लेफ्ट. सुहास पिढेकर यांनी माहिती दिली की राष्ट्रपाल गवारगुरु यांनी जून महिन्यापासून सुरू झालेल्या रिपब्लिक डे कॅम्प (RDC) अंतर्गत आयोजित सर्व टप्प्यांचे प्रशिक्षण कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण केले असून प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.आरडीसी अंतर्गत प्रथम टप्प्यात अमरावती येथे झालेल्या प्रशिक्षण कॅम्पमध्ये त्यांनी ड्रिल, शिस्त, शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण व संघभावना या सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. . या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “राष्ट्रपाल गवार गुरु यांची निवड ही जी. एस. कॉलेजच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्तेचा गौरव आहे. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व व राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत होते, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.”संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,“प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड होणे हा अत्यंत मानाचा सन्मान आहे. राष्ट्रपाल गवारगुरु यांनी संस्थेचे व परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे.”संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट म्हणाले की,“एनसीसी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व राष्ट्रसेवेची जाणीव निर्माण होते. राष्ट्रपाल यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”तर संस्थेचे सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. या यशामागे विद्यार्थ्याची मेहनत, मार्गदर्शन व संस्थेचा पाठिंबा यांचा समन्वय आहे.” 13 महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगाव चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांनी , “राष्ट्रपाल गवारगुरु यांनी जून महिन्यापासून सुरू असलेल्या सर्व आरडीसी कॅम्पमध्ये सातत्य, शिस्त व समर्पण दाखवले. प्रत्येक टप्प्यातील गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरच त्यांची अंतिम निवड झाली आहे.”या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, एनसीसी बटालियन स्टाफ सुभेदार मेजर दिनेश कुमार सुभेदार सचिन बोधे अशोक येवले आणि कॅडेट्स, विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून राष्ट्रपाल गवारगुरु यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


