एशिया न्यूज बीड

गो. से. महाविद्यालयात एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

गो. से. महाविद्यालयात एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

गो. से. महाविद्यालयात एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब, रासेयो च्या वतीने एचआयव्ही–एड्स जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिक ज्ञान आणि सुरक्षिततेचे पालन अत्यावश्यक असल्याचे सांगितले. डॉ. तळवणकर म्हणाले की, एचआयव्ही (Human Immunodeficiency Virus) संसर्ग केवळ काही विशिष्ट मार्गांनीच होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, सुई–सिरिंजचा पुनर्वापर आणि गर्भवती मातेपासून बाळाला होणारा संसर्ग ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती आईकडून गर्भात वाढणाऱ्या बाळाला किंवा प्रसूतीदरम्यान संसर्ग होऊ शकतो. योग्य उपचार घेतल्यास हा धोका कमी करता येतो. चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी जागरूकता वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सुरक्षित लैंगिक संबंध, निरोधाचा वापर, तपासणी केलेल्या रक्ताचाच वापर करावा. रक्त संक्रमण करताना शासकीय मान्यताप्राप्त रक्तपेढीतील तपासलेले रक्तच वापरले पाहिजे., निर्जंतुक सुई–सिरिंज, तसेच एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनी वेळेवर ART उपचार घेणे. हे उपाय प्रभावी असल्याचे डॉ. तळवणकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केले. महिला अधिकारी डॉ. नीता बोचे यांनी विद्यार्थ्यांनी एचआयव्हीविषयी योग्य माहिती घेऊन ती समाजात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दीक्षा खोडे, तर आभार प्रदर्शन सोनल कळसकार यांनी केले. कार्यक्रमाला रासेयोचे अनेक स्वयंसेवक आणि स्वयंसेविका उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *