प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख
खामगाव : गो से महाविद्यालय,खामगाव येथे दिनांक २२ डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांच्या कल्पनेतून गणित विभागतर्फे श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावरती प्रकाशझोत टाकणारी “राष्ट्रीय स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा-२०२५” चे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ८०० विद्यार्थानी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ डी. एस. तळवणकर व प्रमुख मार्गदर्शक डॉ नितेश घुंगरवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर होते व प्रमुख मार्गदर्शक श्री डी. एम. बुरूंगले महाविद्यालय, शेगाव चे प्राध्यापक डॉ नितेश घुंगरवार लाभले तर विशेस उपस्थिती म्हणून प्रा. एस. डी. वाघ होते. कार्यक्रमच्या प्रास्ताविकेत प्रा सचिन शिंगणे यांनी प्रमुख मार्गदर्शक यांचा परिचय व गणित आपल्याला केवळ आकडेमोड शिकवत नाही तर शिस्त,संयम आणि तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावते असे स्पष्ट केले. डॉ नितेश घुंगरवार यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तसेच रामानुजन यांच्या गणितीय योगदानावर मार्गदर्शन केले. वर्ग १२ वी व बी.एस्सी च्या विद्यार्थ्यांना JEE, MHTCET, IITJAM यासारख्या कठीण परीक्षेसाठी समोरजाताना येणाऱ्या अडचणी विस्तारित स्वरूपात सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस तळवणकर यांनी अध्यक्षीय भाषणात गणिताची भीती दूर करून त्याकडे आवडीने पाहण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्यासाठी गणित अभ्यास मंडळ ची स्थापना करण्यात आली त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा पद्माकर कायपेल्लीवार यांनी करताना गणित केवळ विषय नसून विचाराशक्ती तर्क आणि अचुकतेचा पाया आहे . रामानुजन हे केवळ गणितज्ञ नव्हे तर भारतीय बुद्धिमत्तेचा अभिमान होते त्यांचे कार्य आजही जगाला दिशा देत आहे असे सांगितले. आभारप्रदर्शन प्रा योगेश टापरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अथवार, प्रा. तायडे, प्रा नप्ते, प्रा डॉ कुलकर्णी, प्रा ढाले, प्रा सरकटे, प्रा काळे, प्रा निमकर्डे, प्रा मोगल, प्रा जगताप, प्रा खरात, प्रा कदम व शिक्षकेत्तर कर्मचारी यश मोरे यांची उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.


