- हाजी अ. रज्जाक गुलाम रसूल उर्दू शाळेत गणित दिन साजरा
हाजी अ. रज्जाक गुलाम रसूल उर्दू शाळेत महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात गणित विषयाचे शिक्षक श्री. अन्सारी अ. अजिज सर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या गणित क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबाबत रुची निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी फरहिन कासम सय्यद तसेच इतर विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गणित विषयावर आधारित प्रकल्प, चार्ट इत्यादी सादर केले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुलाम रब्बानी सर, कुद्दूस सर, मतीन सर व रियाज सर उपस्थित होते.


