एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम कार्यक्रमाचे मोफत आयोजन
रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – मुन्ना खतीब
केज (प्रतिनिधी) – येत्या २४ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्ताने एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम या गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक मुन्ना खतीब यांनी केले आहे.
केज तालुक्यात प्रथमच पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्ताने या गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन मुन्ना खतीब हे सागर एंटरटेनमेंट ग्रुप च्या माध्यमातून करत आहेत.
या कार्यक्रमात व्हाईस ऑफ रफी म्हणून ओळखले जाणारे इकबाल भाई आणि तौफिक राज यांच्यासह बीड जिल्ह्याच्या गीत संगीत क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या सुमधुर आवाजाने लोकप्रिय झालेल्या ललिता राणी, चुन्नू भाई इत्यादी गायक गाणी सादर करणार आहेत तर साऊंड सिस्टम ची जबाबदारी सचिन कावळे सांभाळणार आहेत. गीत-संगीताचा हा सदाबहार कार्यक्रम केज शहरातील मुक्ताई फंक्शन हॉल, धारूर चौक येथे दिनांक २४ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्ताने केज शहरात प्रथमच एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम हा मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गीत-संगीताचा मनसोक्त आनंद घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मुन्ना खतीब यांनी केले असून अधिक माहिती हवी असल्यास ९८३४५७८४५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे म्हटले आहे.


