बीड जि.प. उर्दू शाळांना स्वतंत्र DDO कोड द्या – संच मान्यतेतील अडचणी दूर करण्यासाठी उर्दू शिक्षक संघटनेची मागणी ✦
बीड, दि. 31 डिसेंबर 2025 – बीड जिल्हा परिषदेत उर्दू व मराठी माध्यमाच्या शाळा 2013 मध्ये स्वतंत्र करण्यात आल्या. मात्र काही शाळांमधील शिक्षकांचे वेतन आजही एकाच DDO कोडवरून काढले जात असल्याने, उर्दू शिक्षकांची नोंद मराठी शाळेच्या ऑनलाइन संच मान्यतेत चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहे.
यावर्षी शालार्थ प्रणालीद्वारे संच मान्यता सुरू झाल्याने, उर्दू शाळांना शिक्षक नोंद, वेतन मंजुरी व संच मान्यतेत तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी, संच मान्यता प्रक्रिया अपूर्ण राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या समस्येवर उपाय म्हणून अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जिल्हा परिषद बीडचे अध्यक्ष श्री. काझी मुशाहेद अजिज, कार्याध्यक्ष खान उस्मान शाईस्ता, तसेच पदाधिकारी शेख इम्रान, फारुकी रईस व कलीम बागे यांनी उर्दू शाळांसाठी स्वतंत्र नवीन DDO कोड मंजूर करावा आणि संच मान्यतेतील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बीड, आणि गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती बीड यांच्याकडे सादर केले गेले.
यावेळी मा. शिक्षणाधिकारी प्रा. श्रीम. मा. डॉ. किरण कुंवर यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस उपशिक्षणाधिकारी शेख जमीर सर आणि मा. गटशिक्षणाधिकारी समंदर खान साहेब उपस्थित होते.
संघटनेच्या या मागणीला शिक्षक वर्गातून मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शिक्षक संघटनेने नमूद केले आहे.


