Skip to content
ऊर्जावान आई सावित्री
हजारो स्त्रियांमध्ये सावित्री, तू एकमात्र
स्त्री शिक्षणासाठी एक केली दिवस रात्र.
समाजाने केला तेव्हा असीम तिरस्कार
पतीच्या साथीचा मिळाला भक्कम आधार.
समाजसेवेसाठी घर सोडले दोघांनी,
मनापासून काम केले हार मानली संकटांनी.
कॉलेज स्थापन करून, मिळवले सर्वोच्च स्थान,
कधीच मानला नाही, जीवनात मानपान.
प्लेगच्या साथीत वाचविता, हरीजनाचे प्राण,
पंचतत्त्वात विलीन झाला आत्मा तो महान.
भाग्यवंत मी, मिळाला तव नामे पुरस्कार,
दीन दुबळ्या जणांचा माझा हात आधार.
तुझी ऊर्जा मिळो मला, पूर्ण होवो काम,
समाधानाने गाठीन, मी मग प्रभुधाम.
श्रीमती. नीता बोबडे (अध्यक्षा निसर्ग संस्था, खामगाव)