एशिया न्यूज बीड

रा. से. यो. अंतर्गत गो. से. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

रा. से. यो. अंतर्गत गो. से. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नीता बोचे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. कांचन थोरात (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापुर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ हे प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केले. प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. कांचन थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असताना स्पष्ट ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि अभ्यासपूर्ण वृत्ती यांच्या बळावर कोणतेही ध्येय यशस्वीरीत्या साध्य करता येते. सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनप्रवास आजच्या तरुणींना आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणारा आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून स्त्री शिक्षण व स्त्री–पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. नीता बोचे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आजच्या युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले ध्येय गाठत आहेत. शिक्षण, आत्मविश्वास व संधी यांचा योग्य उपयोग केल्यास महिलांचा सर्वांगीण विकास निश्चित होतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक पडघन, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव सन्माननीय डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका कु. दीक्षा खोडे यांनी केले, तर कु. प्रतिभा इंगोले हिने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

contributor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *