मिल्लीया गर्ल्स शाळेच्या विद्यार्थिनींचे पोलीस स्टेशनला क्षेत्रीय भेट.
बीड (प्रतिनिधी ) बीड येथील मिल्लिया गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनीचे शहर पोलीस स्टेशनला क्षेत्रीय भेट देण्यात आली या भेटीत सर्वप्रथम विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनचे पी.आय. भल्लाळ साहेब यांची भेट घेतली व पोलीस प्रशासनाचे कार्य कसे चालतात याची संपूर्ण माहिती भल्लाळ साहेबांनी विद्यार्थिनीना दिली. त्यांनी मुलींना संरक्षण कसे करावे गुंडांपासून स्वतःचे बचाव कसे करावे ,वेळ पडल्यास इमर्जन्सी कॉल कशी करावी पिनल कोड काय असतो शहरात कायदा व सुव्यवस्था कशी राखावी दंगल पथकाचे कार्य कोणते, ही सर्व माहिती दिली महिला पोलिसांचे कर्तव्य अशा अनेक बाबींवर भल्लाळ साहेबांनी विद्यार्थिनींना माहिती दिली व मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक सिद्धीखी ईरफान सादुल्लाह उपमुख्याध्यापक ,सुपरवायझरव शाळेतील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते पी.आय भल्लाळ साहेबांनी सर्व विद्यार्थिनींना निरोप दिले व शाळेला मुलाचे सहकार्य केले .


