मिल्लीया महाविद्यालयाची मौजे कामखेडा येथे बालविवाह निषेध रॅली
बीड: मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या मार्गदर्शनात मौजे कामखेडा ता.बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरा मध्ये दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी बालविवाह निषेध जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री.राजेंद्र कुऱ्हे (कामखेडा हायस्कूल कामखेडा) सरपंच प्रतिनिधी जनाब अमीर पटेल, समाजसेवक जनाब सलीम भाई, वसीम भाई यांच्या हस्ते झाले. रॅली शिबिर स्थळ पासून बाजार मैदान, ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदिर, जिल्हा परिषद शाळा या मार्गे काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून गावामध्ये बालविवाह बद्दल जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यां-विद्यार्थिनींनी बालविवाह विरोधी घोषणा दिल्या. या रॅली मध्ये कामखेडा हायस्कूल मधील शिक्षक बिलाल सर, अनिस सर, घाडगे सर, भांडवलकर सर, धापसे सर, हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवायोजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे, प्रा. शोएब पिरजादे, डॉ. शामल जाधव तसेच गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.


