राहत्या घरातून महिला बेपत्ता; शोधासाठी कुटुंबीयांचे आवाहन

भुम, ता. भुम (जि. उस्मानाबाद) : येथील बागवान गल्ली परिसरात राहणाऱ्या मेहेरुन इसाक पठाण (वय ५०) या महिला दिनांक ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी घरातून निघून गेल्यानंतर अद्याप परत आलेल्या नाहीत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत.
बेपत्ता महिला अंगावर निळसर रंगाची साडी व काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला होता. त्यांचा रंग सावळा असून उंची सुमारे ५ फूट आहे. समोरील खालच्या बाजूचा एक दात पडलेला असून डोळ्यांवर थोडासा परिणाम असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्या स्वभावाने भोळसर आहेत.
या महिलेबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठे दिसल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक : ९७६७६७७८१६, ७४१०१०२५०३


